Home अकोले अकोले: कोंभाळणे येथे एसजेवीएन द्वारा स्वच्छता पखवाडा संपन्न.

अकोले: कोंभाळणे येथे एसजेवीएन द्वारा स्वच्छता पखवाडा संपन्न.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे हेल्पएज इंडिया व एसजेवीएन लिमिटेड यांचे वतीने खिरविरे पवन ऊर्जा परियोजना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्वच्छता पखवाडा संपन्न करण्यात आला.
याप्रसंगी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन जागरूकता अभियान म्हणून विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी पर्यावरण वाचवा देश घडवा, कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी, स्वच्छ भारत अभियान एक पाऊल स्वच्छतेकडे, झाडे लावा पर्यावरण वाचवा, प्लास्टिक पिशवी बंद करा, पर्यावरण वाचवा भविष्य घडवा यांसारख्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी हेल्पएज इंडिया कार्यक्रम अधिकारी जमील पटेल, जितेंद्र सोनार, धर्मनाथ मेंगाळ, शिक्षक श्री.गभाले सर, श्री. बारामते सर,श्री. नवले सर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम अधिकारी जमील पटेल यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन जागरूकता अभियान याबाबत माहिती सांगुन प्लास्टिक बंदी संदर्भातही माहीती दिली.
स्वच्छता पखवाडा संपन्नतेसाठी हेल्पएज इंडिया व एसजेवीएन लिमिटेड तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंभाळणे आदींनी परीश्रम घेतले.
Website Title: Latest News komghalane 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here