Home अकोले अकोले-देवठाण रस्त्यावरील साइडपट्टयांचे काम धोकादायक: अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अकोले-देवठाण रस्त्यावरील साइडपट्टयांचे काम धोकादायक: अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अकोले:  अकोले-देवठाण रस्त्यावरील साइडपट्टयांचे काम करताना टाकलेला मातीचा भराव वाहून गेला असून, साइडपट्टया धोकादायक बनल्या आहेत.
काही महिन्यापूर्वीच सुमारे 25 लाख रुपये खर्च करून या साइडपट्टयांचे काम करण्यात आले होते .मात्र अकोले ते देवठाण-गणोरे रस्त्यावरील साइड पट्टयांचे हे काम करताना संबंधित ठेकेदाराने अनेक ठिकाणी  मुरुम न टाकता माती टाकली. या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी त्याच वेळी ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती .मात्र संबंधीत  उपअभियंता यांनी  त्या वेळी त्याकडे दुर्लक्ष केले. एव्हढेच नव्हे तर काम चांगले झाले असल्याचा दावा तेव्हा केला होता .
आता पावसाच्या पाण्यात मुरुमाऐवजी टाकलेली  ही माती अनेक ठिकाणी वाहून गेल्याने भरलेल्या साइड पट्टयांच्या जागेवर खोल खड्डे पडले आहेत. तांभोळ गावाच्या उत्तर दिशेला रस्त्याच्या दोन्हीही बाजूला डांबरी धावपट्टीलगतचा भराव वाहून गेल्याने तीव्र उतार असलेल्या या ठिकाणी वाहनचालकांना सध्या मोठी मोठी कसरत करावी लागत आहे .
मातीने भरलेल्या साइट पट्टयांच्या जागी खोलगट नळ्या तयार झालेले असून, अरुंद डांबरी धावपट्टीवरुन खाली उतरणे वाहन चालकांना अशक्य होऊन बसले आहे. दोन वाहने समोर आल्यास खाली उतरण्याची जोखिम चालक घेत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. विशेष करुन मोठी वाहने खाली उतरत नसल्याने दुचाकीस्वारांची मोठी अडचण होते. या स्थितीतून काही वेळेस अपघात झाले आहेत. तांभोळ ते कृषी उत्पन्न बाजार समितीदरम्यान झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करुन, संबंधितांवर कारवाई करावी. मातीचा भराव टाकून केलेल्या साइडपट्टयांचे बोगस काम पुन्हा त्याच ठेकेदाराकडून करुन घ्यावे अशी मागणी होत आहे. तक्रार करूनही त्याची दखल न घेता ठेकेदाराला पाठीशी घालत अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप आहे.
Website Title: Latest News Akole Devthan Road Dangerous 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here