Home अकोले खिरविरे येथील सर्वोदय विद्यालयातील गणेश बेणके याची विभागीय कुस्तीसाठी निवड

खिरविरे येथील सर्वोदय विद्यालयातील गणेश बेणके याची विभागीय कुस्तीसाठी निवड

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी- विदयार्थ्यांना फक्त चार भिंतीच्या आतीलच शिक्षण देणे महत्वाचे नसुन त्याच बरोबर चार भिंतीच्या बाहेरील शिक्षणही महत्वाचे आहे.विदयार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पुस्तकी ज्ञानाबरोबरच शारिरीक विकासही महत्वाचा मानला जातो. याच उद्देशाने विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.यातीलच एक भाग म्हणून नुकत्याच अहमदनगर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दा. ह. घाडके पाटील क्रिडा संकुल नेवासा फाटा येथे संपन्न करण्यात आल्या. या कुस्ती स्पर्धामध्ये सत्यनिकेतन राजुर संस्थेच्या सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे(ता.अकोले ) येथील माध्यमिक विदयालयातील गणेश बेणके याने घवघवीत यश संपादन करून ग्रिको रोमन या प्रकारातील १७ वर्षाखालील ९२ किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याची पुणे येथे होणाऱ्या विभागीय कुस्तीसाठी निवड झाली आहे. या यशस्वी कुस्तीपटटूस क्रिडा शिक्षक संपत धुमाळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विदयार्थ्याचे तसेच मार्गदर्शक शिक्षकाचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त , संचालक तथा माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, सर्व संचालक मंडळ, शालेय समितीचे अध्यक्ष दिनेश शहा, विद्यालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Get  Latest Marathi News &  Sangamner &  Akole News from Politics, Crime, Sports, Entertainment and local from all Cities Of Maharashtra.
Website Title: Latest News SVM Khirvire Wrestler Winner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here