Home अकोले विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे हि सर्वांची जबाबदारी: शिव व्याखाते अजित दिघे

विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे हि सर्वांची जबाबदारी: शिव व्याखाते अजित दिघे

अकोले: पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईल,टीव्ही,पाहणे या माध्यमाचा वापर कमी प्रमाणात करू द्यावा ,त्या वर लक्ष ठेवा,सर्वच पालकांनी आपल्या पाल्यास विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे व विध्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे हि सर्वांची जबाबदारी असे आवाहन शिव व्याखाते अजित दिघे यांनी केले.ते श्री वरदविनायक देवस्थान कोतूळ व जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित गणपती अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. गणपती अथर्वशीर्षा मध्ये वर्णन केलेल्या क्षमतांचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करून घेत स्वताची प्रगती साधावी. असेही ते पुढे म्हणाले .
        या स्पर्धेत विविध गटात प्रथम क्रमांक  अक्षदा परशुरामी, तनुज फापाळे, वेदिका परशुरामी,यांनी पटकविला तर दुसरा क्रमांक मधुरा बोऱ्हाडे, श्रावणी देशमुख, ईशा फापाळे,कोमल गिते, यांनी तर तृतीय क्रमांक श्रावणी शिंदे, अदिती बुरके, ओम  फुलसुंदर,श्रावणी देशमुख,तर उत्तेजनार्थ तेजस्वी आण्णासाहेब वलवे, प्रार्थना पोखरकर,सानिका हांडे, ओंकार पोखरकर,वरद महाजन यांनी पटकाविला तर विशेषप्राविण्य पारितोषिक प्रणव प्रशांत परशुरामी याने पटकाविले.यावेळी स्पर्धकांना विविध शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
       कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी जेष्ठ नागरिक पुरषोत्तम परशुरामी होते.या वेळी माजी सरपंच रमेश भुजबळ, शिक्षक बँकेचे संचालक गंगाराम गोडे,सोमदास पवार,पद्माकर,महाजन,शरद देशमुख,डॉ.रोहित भुजबळ,आणा साहेब वलवे,देवानंद पोखरकर,गणेश गिरे,मुकुंद खाडे,तुकाराम आरोटे,वासुदेव साळुंके,प्रा.संभाजी पोखरकर,सौ.अरुणा परशुरामी,स्नेहल राउत,आदी सह विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक राउत तर आभार श्री वरदविनायक देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी मानले.यावेळी विद्यार्थ्यांनी सामुदायिक अथर्वशीर्ष म्हटले.
Get  Latest Marathi News &  Sangamner &  Akole News from Politics, Crime, Sports, Entertainment and local from all Cities Of Maharashtra.
Website Title: shiv defines Ajit Dighe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here