Home अकोले राजूर पोलिसांचा दारू हातभट्टीवर छापा

राजूर पोलिसांचा दारू हातभट्टीवर छापा

अकोले: लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने तालुक्यातील आदिवासी भागातील मद्यापीने डोंगराच्या पायथ्याशी जंगलात नदीच्या काठावर गावठी मोहाची दारू काढण्याचा सपाटा उठविला आहे. मात्र राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी पाचनई पिंपरकणे या भागात नदीतून होडीने जाऊन गावठी दारू पकडून मद्यपी व दारू काढण्याची आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पिंपरकणे शिवारातील आढळवाडी येथील रामचंद्र आढळ इसमाच्या घरी हातभट्टीवर मोहाची दारू बनत असल्याची खबर फोनद्वारे मिळताच सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देविदास भडकवाड पो. कॉन्स्टेबल विजय फटांगरे, चालक घनश्याम सदने यांनी सापळा रचून हातभट्टी छापा टाकत दारू ठिकाणावर छापा टाकत मोठा दारू साठा जप्त करून आरोपीस अटक केली.

वाचा: राहत्यात गुन्हेगारांकडून गोळीबार: एकास पकडले, दोन फरार

तर पाचनई येथील सात आरोपींना मुद्देमालासह अटक करून वचक बसविला आहे. या छाप्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.    Website Title: Latest News Rajur police raids liquor kiln

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here