Home अकोले अकोले तालुकयातील अडकलेल्या मजुरांना छतीसगडकडे रवाना

अकोले तालुकयातील अडकलेल्या मजुरांना छतीसगडकडे रवाना

अकोले: अकोले तालुक्यात रोजंदारीसाठी आलेले  छतीसगड राज्यातील जवळपास साडेतीनशे मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले असून त्यामधील ६९ कामगार शुक्रवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास तीन एस.टी. बसमधून छतीसगडच्या सीमेकडे रवाना झाले.

यावेळी अकोले तालुक्यातील आमदार डॉ. किरण लहामटे, तहसीलदार मुकेश कांबळे, नायब तहसीलदार टी. डब्लू. महाले, आगार प्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड आदी उपस्थित होते.

वाचा: संगमनेर तालुक्यात ग्रा.पं. सदस्यावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल

तालुक्यातील मवेशी, कोतूळ, राजूर समशेरपूर, अकोले शहर भागात सुरु असलेल्या आदिवासी आश्रमशाळांच्या इमारतीच्या कामावर मजूर म्हणून हे लोक रोजंदारीसाठी आले होते. काही मजूर रात्री पायी छतीसगडकडे जाण्यासाठी निघाले होते. सरकारच्या धोरणानुसार मोफत प्रवास करून हे मजूर आपल्या राज्याकडे रवाना झाले. अकोले सोडताना त्यांच्या चेहऱ्यावरील आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लपवून राहिली नाही. गोंदिया जिल्ह्यातील साकोली चेकपोस्ट या छतीसगड सीमेवरील गावांपर्यंत मजुरांना पोहोच केले जाणार आहे. चालक व मजुरांना मास्क व सायंकाळसाठी फूड देण्यात आले आहे.  

Website Title: Latest News Trapped laborers from Akole taluka sent

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here