Home अकोले ८ जानेवारी ग्रामीण भारत बंद: किसान सभा

८ जानेवारी ग्रामीण भारत बंद: किसान सभा

अकोले: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील २०८ शेतकरी संघटनांच्या वतीने आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ८ जानेवारी रोजी देशव्यापी ग्रामीण भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळाख्यात अडकू नये यासाठी शेतमालाला दीड पट भावाची हमी मिळेल अशी धोरणे स्वीकारा, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल अशी पिक विमा योजना सुरु करा. आदी मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, लोक संघर्ष मोर्चा, किसान आंदोलन यासंह अनेक शेतकरी संघटनांनी या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आंदोलनाची हाक किसान सभेचे नेते कॉं. अशोक ढवळे, जे.पी.गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले आदींनी दिली आहे.

Website Title: Latest News Rural india closed kisan sabha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here