Home महाराष्ट्र २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार: संजय राउत यांची नवी मोहीम

२०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार: संजय राउत यांची नवी मोहीम

मुंबई: राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजाविणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करण्याचे काम सुरु केले आहे.

२०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी शरद पवार यांच्या नावाचा विचार करावा असे आवाहन संजय राउत यांनी केले आहे. २०२० साली राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी आमच्याकडे तेवढे संख्याबळ असेल असा दावाही संजय राउत यांनी केला आहे. लवकरच रणनीती आखली जाईल असेही राउत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहे. मला वाटते की सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा विचार करावा,  असे राऊत म्हणाले.

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची मोर्चेबांधणी करण्यासाठी खासदार संजय राऊत हे लवकरच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळ राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करणार आहेत. शरद पवार यांच्या नावाला कुणी विरोध करणार नाही, अशा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय कुशाग्रता पाहता त्यांना भारताचा घटनात्मक प्रमुखपदावर बसवणे योग्य ठरेल, असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांचे मोठे योगदान असल्याने पवार यांच्याप्रती राऊत यांची नैतिक जबाबदारी आहेच, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून एक व्यापक अशी योजना तयार केली जाईल असेही राऊत म्हणाले.

Website Title: Latest News NCP sharad pawar name should be consider president of India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here