Home अकोले राजुर: सर्वोदयच्या शुभम लांडगे व सौरभ शिंदे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

राजुर: सर्वोदयच्या शुभम लांडगे व सौरभ शिंदे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

राजुर: अहमदनगर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच दा. ह. घाडगे पाटील क्रीडा संकुल,नेवासा फाटा येथे पार पडल्या.  या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी यश मिळविले. 17 वर्षाखालील मुले फ्रीस्टाइल प्रकारात 48 किलो वजन गटात शुभम लांडगे, तर ग्री कोरोमन प्रकारात 60 किलो वजनगटात सौरभ शिंदे,    यानी प्रथम क्रमांक संपादन करून त्यांची  पुणे येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्याना एम. एन. देशमुख कुस्ती संकुल ( साई सेंटर ) मधील साई मार्गदर्शक श्री. तानाजी नरके यांनी मार्गदर्शन केले.

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख,सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल. पी.पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Website Title: Latest News Selection for Divisional Wrestling

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here