Home अकोले अकोले तालुक्यातील या गावाचा रस्ता पक्का करुन मिळावा ही मागणी पुर्ण...

अकोले तालुक्यातील या गावाचा रस्ता पक्का करुन मिळावा ही मागणी पुर्ण होत नसल्याने मतदानावर बहिष्कार

अकोले: राज्यात निवडणुकांचे पडघम वाजु लागले आहेत राजकीय नेते विकासाचा दावा करताय मात्र अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदार संघात असलेल्या डोंगराळभागातील पेमरेवाडीच्या ग्रामस्थांनी गावाकडे येणारा रस्ता पक्का करुन मिळावा ही मागणी पुर्ण होत नसल्याने आता आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्कच न बजावण्याचा निर्णय घेतलाय.
अहमदनगर जिल्ह्यातील  पेमरेवाडी हे गाव तस  संगमनेर तालुक्यात शासकीय कामकाज संगमनेरात मात्र त्याचा आमदार तालुक्याच्या शेजारीच असलेल्या अकोलेचा अर्थात संगमनेर तालुक्यातील काही गावे ही अकोले मतदार संघात जोडली गेल्याने विकास कामे होतांना आपण जणु दोन देशांच्या सिमेवर आहोत की काय याचा अनुभव सध्या या ग्रामस्थांना येतोय. संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीची लोकसंख्या जवळपास तीनशे ते चारशे आहे. पेमरेवाडी अकोले विधानसभा मतदारसंघात येते. माजी मंत्री मधुकर पिचड आणि आता आमदार वैभव पिचड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. स्वतंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही अतिदुर्गम, उंच डोंगरावर असलेली पेमरेवाडी आजही विकासापासून कोसोदूर आहे. रस्ते, पाणी या मूलभूत गरजा पुर्णता  पुरविल्या गेलेल्या नाहीत गावाला जाण्या साठी बोटा ते पेमरेवाडी हे पंधरा ते वीस किलोमीटरचा वळसा घालुण जावे लागते त्यातही रसत्याच डांबरीकरण झालेल नसल्याणे चिखलातून कसरत करावी लागते हा रस्ता दुरुस्त करुन मिळावा तसेच गावा पासुन अव़घ्या पाच किलो मिटर अंतरावरुन आता नाशिक पुणे महामार्ग देल्याने हा रस्ता करुन मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करतायेत. 
गेल्या अनेक वर्षा पासुन रसत्याची दुरावस्था आणि गावाला वळसा घालुन जाव लागत असल्याने ग्रामस्थांनी संकाप व्यक्त करत नुकत्याच झालेल्या  लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातल्याने येथे शुन्य टक्के मतदान झाल होत मात्र त्या नंतरही या ग्रामस्था़च्या मागणी कडे दुर्लक्ष केल जात असल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरही बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
प्रत्येक निवडणुकीत राज्यकर्ते येवुन  आश्वासन देतात त्या नंतर मात्र कोणी फिरकत नाही बाळासाहेब थोरांताचा तालुका तर आमदार वैभव पिचड दोन्ही मोठे नेते मात्र पठार भागातील अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबीत असतांना प्रश्न सुटत नाहीये
Website Title: Latest News Akole Road demand of Village

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here