Home अकोले अकोले: भाजप सरकार व ईडी यांच्या निषेधार्थ शुक्रवारी अकोले बंदची हाक

अकोले: भाजप सरकार व ईडी यांच्या निषेधार्थ शुक्रवारी अकोले बंदची हाक

अकोले: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे भाजप सरकार व इडी यांच्या निषेधार्त राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी दिनांक २७ अकोलेत बंद पुकारला आहे.

अकोले तहसीलदार व अकोले पोलीस स्टेशन यांना अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले. तहसीलदार कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार विनोद गिरी यांना निवेदन देण्यात आले.

विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपा सरकार शरद पवार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे. भाजपाला निवडणुकीत राजकीय फायदा मिळावा म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, आचारसंहिता लागू झाल्या नंतरचा हा प्रकार दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शरद पवार कोणत्याही सहकारी बँकाचे सदस्य अथवा अध्यक्ष नव्हते. त्यामुळे कोणत्याही सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारात सहभागी नव्हते. केवळ बदनाम करणे, निवडणुका जिंकणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन इडी भाजप सरकारच्या इशार्यावर काम करत आहे. महाराष्ट्रातून शरद पवार यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत आहे.  

Website Title: Latest News Akole Band on Friday 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here