Home अकोले अकोले: पांगरी येथे दोनशे कुटुंबांनी पिकवला विषमुक्त भाजीपाला.

अकोले: पांगरी येथे दोनशे कुटुंबांनी पिकवला विषमुक्त भाजीपाला.

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी –अकोले तालुक्यातील पांगरी या गावात रासायनिक भाजीपाला व त्यापासुन शरिरास होणारी हानी यास फाटा देवून दोनशे महिलांनी पंधरा प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून परसबाग फुलवल्या आहेत. इंडियो एअरलाईन्स फार्म पुणे व चैतन्य संस्था राजगुरूनगर या संस्थांनी पुढाकार घेऊन ग्रामीण महिला उपजीवीका सक्षमीकरण या प्रकल्पाअंतर्गत दोनशे महिलांना सेंदिय प्रकारच्या परसबागांना बियानांचे वाटप करण्यात आले. या बियाणांचे व परसबागांच्या लागवडीसाठी प्रकल्य प्रभाग व्यवस्थापक युवराज आवारी तसेच स्वाती गावंडे यांनी मार्गदर्शन केले.
येथील महिलांनी विषमुक्त भाजीपाला पिकवण्यासाठी चांगला प्रतिसाद दाखवत सदरची लागवड आपल्या घराशेजारी मोकळया जागेत परसबागेची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने भेंडी, मुळा, भोपळा, दोडका,कारले, घोसाळे, वांगी, मिरची, डांगर यांसारख्या विषमुक्त ताज्या भाज्या मिळत आहेत.
यामुळे या कुटूंबांची आर्थिक बचत झाली असुन सदर भाजीपाला बाजारपेठेत विकून उत्पन्न वाढले आहे.विषमुक्त भाजीपाला हे एक योगदान ठरत असून या परसबागांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. येथील महिलांना
चैतन्य संस्थेचे प्रकल्प समन्वय उमेश काळे यांनी आपल्या वातावरणात उगवणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड केल्यास जैव साखळी टिकेल. या उपक्रमामुळे रोज ताजा भाजीपाला तसेच पोषक आहार मिळण्यास मदत होत आहे. असे मार्गदर्शन केले.
उपक्रम यशस्वीतेसाठी गंगुबाई पथवे, सुनिता गावंडे, हिराबाई पारदी, वैशाली पारदी, अनुसया गावंडे, संगिता पथवे, विमल पारदी, कविता पथवे, अंजना गावंडे आदी महिलांनी परिश्रम घेतले.
Website Title: Latest News Without Poison Vegetables  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here