टरबूजखाली लपवून सुगंधी तंबाखूची तस्करी, १५ लाखांचा माल जप्त
अहमदनगर: लॉकडाऊन सुरु असताना विक्रीस बंदी असलेल्या मालाची तस्करी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी प्रकरणानंतर टेम्पोत टरबूजाखाली सुगंधी तंबाखू लपवून तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. या कारवाईत सुमारे १५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी दिनांक १ मी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील काटवन खंडोबा रोड परिसरात एक टेम्पो पकडला आहे. टेम्पोची तपासणी केली असता टरबुजाच्या थरावरती सुगंधी तंबाखूच्या १०५ गोण्या लपवून ठेवल्या होत्या. बाजाराच्या किमतीनुसार या तंबाखूची किंमत ९ लाख ४५ हजार रु. आहे. टेम्पो, टरबूज, सुगंधी तंबाखू असा एकूण १५ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
रमजान मन्सूर पठाण वय २८ व आयाज इसाक बागवान वय ३९ रा. दोघेही काटवन, खंडोबा परिसर नगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Website Title: Latest News Smuggling of fragrant tobacco in Ahmedngar