Home अकोले आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत: आ. डॉ. किरण लहामटे

आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत: आ. डॉ. किरण लहामटे

अकोले: तालुक्यातील काढणीला आलेल्या शेतपीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गोवोगावी जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहे. सर्वच भागात शेतीचे नुकसान झाले असून सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन  शेतकऱ्यांना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिले.

परतीच्या मुसळधार पावसाने तालुक्यातील मुळा, प्रवरा, आढळा खोऱ्यासह आदिवासी भागातील शेतमालाची हानी झाली आहे. काढणीला आलेले भात पिक पाण्याने सडले तर बाजरीच्या कणसान मोड फुटले आहे. सोयाबीन हातचे  गेले असून खरीपाची बाजरी मका पिके नेस्तंभूत झाले आहेत. नुकसान भरपाईचा मागणीचा तगादा सुरु झाल्याने प्रशासनाने पिक नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत. आ.डॉ. किरण लहामटे यांनी नुकसान पाहणी दौरा सुरु केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत लवकरात लवकर मिळून देऊ अशी गवाही देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम ते करीत आहे.

Website Title: Latest News stand firmly behind the farmers MLA Kiran Lahamate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here