Home महाराष्ट्र राजकीय गतिरोध शिगेला: संजय राउत राज्यपालांना भेटले  

राजकीय गतिरोध शिगेला: संजय राउत राज्यपालांना भेटले  

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण शिगेला पोहोचले आहेत त्यातच आज शिवसेना नेते संजय राउत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्योरी यांची भेट घेतली. ही भेट फक्त सदिच्छा भेट होती असे सांगत राज्यातील सस्पेन्स अधिक वाढविला आहे. या भेटीमधून शिवसेना सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते असे वर्तविण्यात येत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्योरी यांची भेट घेतल्यानंतर संजय राउत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राउत म्हणाले की, मी आणि रामदास कदम काही वेळापूर्वीच राज्यपालांना भेटलो ही सदिच्छा भेट होती. बऱ्याच दिवसांपासून राज्यपालांची भेट घेण्याची इच्छा होती ते गणित आज जुळून आले आहे. या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. तसेच राज्यातील सरकार स्थापनेबाबत शिवसेना खोडा घालणार नाही असेही आश्वासन दिले.

Website Title: Sanjay Raut meets Governor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here