Home महाराष्ट्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: राज्याची विभागणी तीन झोनमध्ये, पहा आपण कोणत्या झोनमध्ये

सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: राज्याची विभागणी तीन झोनमध्ये, पहा आपण कोणत्या झोनमध्ये

मुंबई: वाढत्या करोनावर नियंत्रण करण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३०  एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे यानंतर सरकारने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. रेड, ऑरेंज,आणि ग्रीन असे तीन झोनमध्ये राज्याची विभागणी झाली असून त्यानुसार जिल्हा पातळीवर हालचाली सुरु आहेत.

रुग्णांच्या संख्येनुसार राज्यातील जिल्ह्यातील विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, पालघर, सांगली, रायगड, औरंगाबादचा समावेश रेड झोन मध्ये करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, सातारा,रत्नागिरी, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर,उस्मानाबाद,जळगाव,जालना, बीड, अमरावती, हिंगोली, लातूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, गोंदिया, वाशीम या जिल्ह्यांचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. सोलापूर, धुळे, नंदुरबार,वर्धा, सोलापूर, नांदेड, परभणी, चंद्रपूर,भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.

ज्या जिल्ह्यात १५ पेक्षाजास्त करोनाबाधित रुग्ण आहे त्यांचा समावेश रेड झोन मध्ये करण्यात आला आहे. त्यापेक्षा कमी असलेल्याचा ऑरेंज झोनमध्ये तर एकही रुग्ण नाही अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे. जिथे रेड झोन आहे तिथे लॉकडाऊन सुरूच राहून आणखी कडक निर्बंध लादणार आहे.  तर ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमधील सीमाच बंद राहतील. तेथील काही निर्बंध शिथिल करण्यात येतील. वाहतुकीत सवलत देण्यात येईल. कार्यालय सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. ग्रीन झोन मधील जिल्ह्यांना अधिक दिलासा मिळेल. येथील निर्बंध हटवले जातील आणि जनजीवन पूर्वपदावर येण्यास हळहळू सुरुवात होईल.

Website Title: Latest News state divided into three zone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here