Home महाराष्ट्र पीएसआयची कानशिलावर गोळी झाडून आत्महत्या

पीएसआयची कानशिलावर गोळी झाडून आत्महत्या

मालेगाव: मालेगाव शहरातील करोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या पोलीस दलातील उपनिरीक्षक अजहर शेख यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच आपल्या कानशिलावर रिव्हालवराने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. अजहर शेख यांच्यावर पोलीस उप अधीक्षक रत्नाकर नवले यांचे रीडर म्हणून जबाबदारी होती.

शनिवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग मालेगावात असताना हा प्रकार घडला आहे. सायंकाळी सिंग यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाणे येथील सुसंवाद हॉलमध्ये करोनासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक सुरु होती. याचवेळी या सभागृहाच्या आवारात अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला. कशाचा आवाज आला हे पाहण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वशीर शेख बाहेर आले असता महिला समुपदेशन केंद्रासमोरील झाडाखाली पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. अचानक घडलेल्या या घटनेने मालेगाव पोलीस दल हादरून गेले आहे. अजहर शेख यांनी स्वतःवर गोळी झाडून का घेतली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.   

Website Title: Latest News Malegaon PSI Suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here