Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

संगमनेर तालुक्यात ११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या घराच्या डिग्रस येथे तांबडे वस्तीवर ११ वर्षीय मुलगा घराच्या पाठीमागे खेळत असताना पाण्याच्या टाकित पडल्याने पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना दि. १६ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने डिग्रस गावात हळहळ व्यक्त होत आहे.

डिग्रस येथे राहणारे आण्णासाहेब नामदेव तांबडे  यांचा मुलगा हर्षल आण्णासाहेब तांबडे (११ वर्षाचा) हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस येथे इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होता.

   हर्षल हा आपल्या घराच्या पाठिमागे खेळत  असताना तो घराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकिजवळ गेला असता खेळता खेळता पाण्याच्या टाकित पडला. यावेळी घरातील सर्व व्यक्ती शेतात असल्याने उशिरा लक्षात आले व तोपर्यंत तो पाण्यात बुडाला होता .

त्याला संगमनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याला वैद्यकीय अधिकार्यांनी  मृत घोषित केले. याबाबत संगमनेर ग्रामीण पोलीस ठाणे येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या अपघातामुळे तांबडे परिवारावर शोककळा पसरली आहे.

Website Title: Latest News student death drawn in tank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here