अकोलेत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
अकोले: अकोले तालुक्यातील वीरगाव येथे राहणाऱ्या शांताराम चिमाजी लांडगे या ५१ वर्षीय शेतकऱ्याने बँकेच्या व खासगी सावकारी कर्जाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वीरगाव येथील शेवाळे वस्तीजवळ राहत असणारे मयत शांताराम लांडगे यांचा मुलगा शुभम हा दुपारी आपल्या वडिलांना फोन करीत त्यांना पाहण्यासाठी गेला असता वडील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्याने एकच टाहो फोडल्यावर बाजूचे लोक तेथे आले. त्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवले व अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविले मात्र त्यांची प्राणज्योत मालविली होती. मयत लांडगे यांच्यावर संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Website Title: Latest News suicide farmer in virgaav