Home अकोले राजूर: सर्वोदयची कु. माया लहामटे राज्यस्तरीय जुनिअर ज्युदो स्पर्धेसाठी निवड  

राजूर: सर्वोदयची कु. माया लहामटे राज्यस्तरीय जुनिअर ज्युदो स्पर्धेसाठी निवड  

राजूर:- जिल्हा स्तरीय निवड चाचणी वाडिया पार्क क्रीडा संकुल, अहमदनगर येथे जिल्हा स्तरीय जुनिअर ज्युदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील कु. माया सुरेश लहामटे १९ वर्षाखालील 52 किलो वजनगटात नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थिनीला प्रा.विनोद तारू यांनी मार्गदर्शन केले.

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.एम.एन. देशमुख, सचिव टी.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, विश्वस्थ विवेक मदन, प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य लहानू पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे, प्रा. एस. एस. पाबळकर, प्रा. नवले एस.बी. प्रा. अजित गुंजाळ व सर्व शिक्षकांनी विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Website Title:  Latest News Svm Rajur state level Judo Competition Maya Lahamte

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here