अकोले तालुक्यात प्रेमी युगालांची आत्महत्या
राजूर: अकोले तालुक्यातील जामगाव येथील प्रेमीयुगलाने जामगाव शिवारातील शेतात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काल शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जामगाव शिवारातील उपळीच्या शेतात आंब्याच्या झाडाला प्रदीप पथवे वय २१ व तेजल मेंगाळ वय १९ या दोघा प्रेमीयुगालानी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबतीची खबर राजू मेंगाळ यांनी पोलिसांना दिली.
मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ च्या सुमारास रहात्या घरातून तेजल मेंगाळ हि निघून गेली तिचे गावातील प्रदीप पथवे यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते.
घरातून नुघून जाऊन त्यांनी काल जामगाव शिवारात आत्महत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांनी आकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ३१/२०१९ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रकाश निमसे करत आहे.
Website Title: Suicide News lovers suicide in Akole