Home अकोले दीपक पाचपुते महात्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

दीपक पाचपुते महात्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

अकोले ( प्रतिनिधी ):  तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिर येथे कार्यरत असलेले उपक्रमशिल शिक्षक दीपक माधव पाचपुते यांना महात्मा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा महत्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग येथे प्रदान करण्यात आला.
दीपक पाचपुते हे मराठी विषयाचे शिक्षक असून सर्वोदय विद्यालयात सातत्याने नवनवीन उपक्रमांचे आयोजन करत असतात. पाठ्यपुस्तकातील ‘लेखक -कवी विद्यार्थ्याच्या भेटीला’ हा त्यांचा उपक्रम राज्यभर पोहचला. खिरविरे  गावाचा इतिहास येथील  विद्यार्थ्यानी पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली  गोळा करून त्याचे हस्तलिखित ‘इतिमाग’ पुस्तक तयार केले.
विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास सहली, विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसीत करणारे विविध भाषा विषयक उपक्रम . यांचे आयोजन सातत्याने होत असते. तसेच ते मराठी अध्यापक मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. पाचपुते यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
या पुरस्काराबद्दल सत्यनिकेतनचे अध्यक्ष एम.एन. देशमुख, सचिव टी.एन. कानवडे, विश्वस्त विवेक मदन, शालेय समितीचे पदाधिकारी सरपंच व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
Website Title: Latest News Deepak Panchpute Mahatma Jyotirao Phule honored

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here