Home अकोले १४ वे राज्यस्तरीय विज्ञान नाटयोत्सव २०१९ च्या स्पर्धेत कळसची एकमेव जिल्हा परिषदेची...

१४ वे राज्यस्तरीय विज्ञान नाटयोत्सव २०१९ च्या स्पर्धेत कळसची एकमेव जिल्हा परिषदेची शाळा

कळस: १४ वे राज्यस्तरीय विज्ञान नाटयोत्सव २०१९ च्या स्पर्धेत कळस ची अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद अंतरराष्ट्रीय शाळेने सहभाग नोंदविला असून राज्यातून सहभागी झालेली एकमेव जिल्हा परिषदेची शाळा होती.
      नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय भारत, शालेय शिक्षण  व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी,मुंबई आणि प्रादेशिक विज्ञान प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रवीनगर,नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित १४वे राज्यस्तरीय विज्ञान नाटयोत्सव २०१९. ८ नोव्हेंबर रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून एकमेव प्राथ. शाळा म्हणजे जि.प. प्राथ. शाळा कळस  ता अकोले. ही राज्यस्तरापर्यत पोहचली. सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचा राज्यस्तरावर प्रशस्तीपत्रक देवून उचीत गौरव व सन्मान करण्यात आला.  राज्य पातळीवर  प्राथमिक शाळेचे कौतुक झाले.१४ वि नाट्यस्पर्धा होती  प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ही मजल मारली. या स्पर्धेत इयत्ता दहावी पर्यंत चे विद्यार्थी सहभागी झाले होते. कळस चा बालचमू सर्वात कमी वयाचा व जिल्हा परिषद शाळेचा होता. सर्वांच्या तोंडून गौरवदगार बाहेर पडत होते. या कार्यक्रमाचे उदघाटन नागपूर चे उपयुक्त तेलंग ,शिक्षण अधिकारी अभिमन्यू भेलावे, शिक्षण उपसंचालक मेंढे, अकोले तालुक्याचे सुपुत्र व नागपूर पोलिस महानिरीक्षक बी. जी. गायकर ,प्रबोधनकार वसंत हंकारे यांच्या हस्ते झाले.
       यास्पर्धेत अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि प प्राथ शाळा कळस बु।। शाळेने पर्यावरण संवर्धन या विषयांतर्गत “पृथ्वी बचाओ जीवन बचाओ” सहभाग नोंदवीला. स्पर्धा ही सहावी ते दहावी या गटासाठी आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदची एकमेव शाळा कळस बु यात सहभागी झाली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी जि प शाळा उत्कृष्ट काम करतात हे दाखवून दिले. या नाटिकेस पुणे विभागात व अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.
    या नाटिकेस मुख्याध्यापक एकनाथ दिघे शिक्षक स्मिता धनवटे, माधवी गोरे, भागवत कर्पे संगीत शिक्षक श्री कोंडार सर यांनी मार्गदर्शन केले. यात विद्यार्थी तनवी अविनाश वाकचौरे, उत्कर्षा सचिन वाकचौरे, अक्षदा संजय वाकचौरे, सायली पुरुषोत्तम वाकचौरे, श्रावणी संदीप ढगे, मोनाली भाऊराव वाकचौरे, स्नेहल विनोद हुळवले, श्रुतिका राजेंद्र वाकचौरे सहभागी झाले.
        या सर्व विध्यार्थी व शिक्षक यांचे जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती कैलासराव वाकचौरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, सिताराम वाकचौरे, सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, रिपाई उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, सरपंच योगिता वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, नितीन वाकचौरे, नामदेव निसाळ, प्रकाश बिबवे, ईश्वर वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे यांनी अभिनंदन केले आहे.
Website Title: Latest News State Level Science Theater Festival 2019 Kalas School

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here