Home अकोले विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपली साथ महत्वाची -आ. वैभवराव पिचड.

विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपली साथ महत्वाची -आ. वैभवराव पिचड.

दुधगंगा विस्तार कक्ष उद्घाटन सोहळा संपन्न.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी- समाजहिता साठी अनेक विकासात्मक कामे केली. यापुढील काळात देखील करणार आहोत. या सर्व विकास कामांना गती देणे महत्वाचे असुन हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपली साथ महत्त्वाची असुन रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो. पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे पाहू नका. त्या रस्त्यावर चालत रहा असे गौरोद्गार आ. वैभवराव पिचड यांनी काढले.
पिंपळगाव नाकविंदा(ता. अकोले ) येथे दुधगंगा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाचा विस्तार कक्ष उद्धाटन सोहळा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. यावेळी आ. वैभवराव पिचड व्यासपिठावरून बोलत होते.
या प्रसंगि कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर हे होते.
यावेळी जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊपाटील नवले, अकोले ता. एज्युकेशन सोसा. सेक्रेटरी यशवंत आभाळे, अगस्ती कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे,कारभारी बंदावणे, दुधगंगा पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठलराव चासकर, भाऊसाहेब कासार, कैलास शेळके, बाजीराव दराडे, सरपंच सुमन आढळ, उपसभापती मारूती मेंगाळ, राजुर गावचे उपसरपंच गोकुळ कानकाटे, विनोद हांडे, पंढरीनाथ बेणके, प्रवीर मालुंजकर, सुरेश गडाख, पंढरीनाथ वाकचौरे, विठ्ठल नवले यांसह मारूती काळे, बबन आभाळे, विठ्ठल बोऱ्हाडे, सखाराम लगड, किसनपाटील लगड, संपत आभाळे, नामदेव लगड, राजेंद्र बगनर, भाऊसाहेब लगड, भास्कर काळे, नवनाथ लगड, संदिप लगड, मारूती आभाळे यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आ.पिचड पुढे बोलताना म्हणाले कि, दुधगंगा पतसंस्थेमुळे गावातील आर्थिक उलाढाल होऊन गावाचा कायापालट करण्यास उत्तम मार्ग सापडेल. त्यामुळे पैसा व वेळीची बचत होईल. भांडवल गुंतवणुकीच्या माध्यमातुन जमीन उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी विठ्ठलराव चासकर हे दुरदृष्टी नेतृत्व असुन दुधगंगा पंतसंस्थेच्या माध्यमातुन नक्कीच गावाला योग्य दिशा मिळाली असुन समाजहितासाठी उचललेले पाऊल योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी भाऊपाटील नवले, भाऊसाहेब कासार, बबन आभाळे, विनोद हांडे, मारुती आभाळे यांनीही आपले विचार प्रतिपादीत केले.
कार्यक्रमाच्या प्रास्तावणेत दुधगंगा पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठलराव चासकर यांनी पतसंस्थेचा आर्थिक ताळेबंद सांगुन पतसंस्था हि आर्थिक देवाणघेवाणीचे महत्वाचे केंद्रबिंदु असल्याचे मत प्रतिपादीत करून आपल्या सर्वांच्या विश्वासाचे बळावर, ज्ञान अज्ञातांच्या सहकार्याने संस्थेच्या विविध शाखांच्या विस्तारानंतर या कक्षाचे उद्घाटन झाल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन लगड यांनी केले. तर अकोले पंचायत समितीचे उपसभापती मारूती मेंगाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारी संचालक अशोक शिंदे, भागवत सहाणे यांसह पतसंस्था कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
Website Title: Latest News support is vital to driving the growth Vaibhavao Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here