Home अकोले राजूर: सर्वोदय विद्यालयात गणरायाचे जल्लोषात आगमन

राजूर: सर्वोदय विद्यालयात गणरायाचे जल्लोषात आगमन

राजूर: ज्या उत्सवाची केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला ओढ असते तो उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवांनिमित्त लाडक्या गणरायाचे गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर,राजूर विद्यालयात मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे.

एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार, मोरया रे बाप्पा मोरया … मंगलमुर्ती मोरया, बाप्पांचा स्वागत सोहळा त्यात टाळ, मृदुंग,ढोल ताशांचा नाद गुलाल फुलांची उधळण अशा भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आज बाप्पांचे आगमन झाले आहे. बाप्पांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून आले. या उत्साहात विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. आरती गणपती स्तोत्र, मंत्र असे मंगलदायी व भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात श्री. बारवकर एस.आर. घिगे बी.एस. व पुंजीराम पवार यांच्या अभंग भजनांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.

या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. उप प्राचार्य श्री. पर्बत एल.पी. पर्यवेक्षक श्री. नरसाळे एस.ए. श्री. पाबळकर एस.एस.श्री. आभाळे एन.एम. श्री.गुंजाळ अजित आदी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन साबळे आर.डी. शेटे सुरेश, मढवई आर.आर, पांडे आर.पी. व सौ. सावंत बिना यांनी केले होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देशमुख एस.आर.गिरी सर, शिंदे जी.एल. आरोटे जालिंदर, श्रीमती भालेराव एस.व्ही. मालुंजकर एम.एस. बनकर भाऊसाहेब, तारू व्ही.टी. पांडे व्ही.आर. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

Website Title: Latest News SVM Rajur Ganpati Innovation 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here