Home अकोले अकोले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सर्वोदय विद्यालयाचे यश

अकोले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सर्वोदय विद्यालयाचे यश

राजुर: अकोले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच एम. एन. देशमुख महाविद्यालय राजुर येथे पार पडल्या.  या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी यश मिळविले.  यामध्ये 14 वर्षाखालील मुले 41 किलो वजन गटात चौघुले, 17 वर्षाखालील मुले फ्रीस्टाइल प्रकारात 48 किलो वजन गटात शुभम लांडगे, 51 किलो अनंत गागरे, 65 किलो शुभम पाटील, 71 किलो ऋषिकेश कुदनर,ग्री कोरोमन प्रकारात 45 किलो वजन गटात शुभम लांडगे, 48 किलो दत्तात्रय सातकर, 51 किलो नचिकेत हंगेकर, 60 किलो सौरभ शिंदे, 80 किलो अभिनंदन चमकले तर 17 वर्षाखालील मुली 46 किलो वजनगटात दामिनी शिंदे, 50 किलो सविता कोंडार या सर्वानी प्रथम क्रमांक संपादन करून त्यांची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्याना एम. एन. देशमुख कुस्ती संकुल ( साई सेंटर ) मधील साई मार्गदर्शक तानाजी नरके यांनी मार्गदर्शन केले.

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख,सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, संचालक विलास पाबळकर व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल. पी.पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी अभिनंदन व कौतुक केले.

तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. विनोद तारू,जालिदर आरोटे, भारत भोसले, प्रा. विकास नवले ,भाऊसाहेब बनकर यांनी परिश्रम घेतले.

Website Title: Latest News SVM wins in Akole taluka wrestling competition

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here