Home अकोले समशेरपूरच्या अगस्ती विद्यालयात दिपाली देवळे यांच्या हस्ते मिनी सायन्स सेंटरचे उदघाटन पार...

समशेरपूरच्या अगस्ती विद्यालयात दिपाली देवळे यांच्या हस्ते मिनी सायन्स सेंटरचे उदघाटन पार पडले

समशेरपूर: एस एस अँड सी ग्लोब ऑफ सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने समशेरपूरच्या अगस्ती विद्यालयात मिनी सायन्स सेंटर लॅब मिळाली यानिमित्त फाउंडेशनचे व्यवस्थापक सौ दिपाली देवळे यांच्या हस्ते सायन्स सेंटरचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अगस्ती विद्यालयात करण्यात आले होते यानिमित्त विद्यालायचे प्राचार्य अण्णासाहेब अडांगळे यांनी आपल्या मनोगतात मिनी सायन्स सेंटर चे महत्व ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञान विषयाचे सखल ज्ञान प्रयोगातून कृतीतून  मिळेल व ज्ञान रचनावाद संकल्पना दृढ होईल असे सांगितले .
या लॅब मध्ये विविध प्रयोग प्रतिक्षके व प्रोजेक्टर स्क्रिन आणि संगणक व आधुनिक विज्ञानाचे पुस्तके मिळाली आहेत एकंदरीत साडेपाच लाख रुपयांच्या वस्तू मिळाली आहेत.
सौ दिपाली यांनी सेवा सहयोग फाउंडेशन ग्रामीण भागातील शाळांसाठी कशा प्रकारे काम करते या बद्दल माहिती दिली.
कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जेष्ठ विश्वस्त डॉ चंद्रकांत मोरे अद्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख पाहुणे म्हणून विनय बर्वे प्रकल्प प्रमुख होते तसेच कार्यक्रमास अमृतसागर दूध संघाचे मा व्हॉइस चेयरमन पोपटशेठ दराडे,समशेरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन दराडे,भास्कर दराडे,कासंमभाई मणियार,अरीफभाई शेख, विष्णू दराडे, राजू भरीतकर, राजू फोडसे, पत्रकार संजय गोरे, जि प शिक्षक कासार सर, पावसे सर, रामनाथ घोडसरे सर, पाचपुते सर ,जेष्ठ पत्रकार टाकळकर सर उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉक्युमेंटरी स्कुलकीट बाल कलाकार सौरभ रामनाथ सदगीर याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयराम उगले यांनी केले तर प्रो गणपत धुमाळ व बोरुंडे डी पी यांनी कार्यक्रमास विशेष मेहनत घेतली तर प्रो सुरेश वाकचौरे व पुष्पवती गावडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
Website Title: Latest News Inauguration of Mini Science Center in Agasti School

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here