Home अकोले अकोले: डोंगरगाव ग्रामस्थांचे उपोषण सुरू

अकोले: डोंगरगाव ग्रामस्थांचे उपोषण सुरू

अकोले: अकोले तालुक्यातील डोंगरगाव तालुका अकोले येथील सरपंच व लाभधारक शेतकरी यांनी उपोषणाला  बसले आहे
  आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्यामुळे कालव्यांना सोडण्यात आलेले पाणी प्राधान्याने गाव तलावात चालू असताना चिकणी येथील काही समाजकंटकांनी रोजी डोंगरगाव येथील वेल रात्री बेकायदेशीरपणे तोडून टाकला परिणामी वेलचे पाणी हे रस्त्याने वाहत असून खडीकरण केलेला रस्ता वाहून गेला आहे त्यामध्ये पिंपळमळा डोंगरगाव येथील शाळेचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे तसेच शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची येण्या-जाण्याची मोठी गैरसोय झाली असून संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करून आणि हे पानी पाटबंधारे रोटेशन दिल्याप्रमाणे चिकणी हद्दीतून सोडण्यात यावे व नुसकान झालेल्या रस्त्याची आपल्या विभागामार्फत करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालय समोर हनुमान हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये उपोषणास बसण्यात आले आहे
  तसेच चिकणी ग्रामस्थांनी संगमनेर येणाऱ्या बसेस दोन दिवसापासून बेकायदेशीर रीत्या आडून शाळेतील विद्यार्थ्यांचे पेपर चालू असताना देखील त्यांनी बसेस  बंद करण्यात आल्या त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे  
   या उपोषणामधील प्रमुख मागण्या अशा आहेत की समाजकंटकांनी तोडलेला वेलची ताबडतोब बांधून घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे, सरोदे वाडी येथील ढोरखळई येथील बंधारे भरून देणे, डोंगरगाव येथील गाव तळी भरणे, मायनर 1 ला पाणी सोडणे, वेळोवेळी एसटी बसेस अडवून विद्यार्थ्यांच्या शाळेचे नुकसान करणाऱ्यांवर कार्यवाही करणे
यावेळी आमदार वैभव पिचड यांच्या मध्यस्थीने जलसंपदा विभागाच्याअधिकार्‍यांबरोबर चर्चा घडून खालील विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये समाजकंटकांनी तोडलेले वेल बाबत पोलीस केस दाखल करण्याचे निर्णय झाला आहे, वेल तोडलेल्या समाजकंटकांनी बांधकाम पूर्ण करून सकाळी सात वाजता मुख्य पाटाने पाणी सोडावे, आणि डोंगरगाव येथील गाव तळे , ढोर खळई येथील बंधारे भरून दिले जातील, वेल तोडण्यामुळे माऊली पांदी येथील रस्त्याचे नुकसान भरपाई संदर्भात वरिष्ठ अधिकारी बी जी नान्वर यांना अहवाल सादर करावा, पाणीवाटप संदर्भात संबंधित शिवार कॅनॉल मार्फत करावे, पुढील नियोजन कॅनोन द्वारे करण्यात यावे, असे निर्णय झाले जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी आर एम देशमुख व रजनीकांत  कवडे यांनी हे सर्व मान्य करून उपोषण सोडण्यास भाग पाडले
यावेळी तालुक्याचे मा आमदार वैभव पिचड, सरपंच,महसूलचे अधिकारी, तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, लाभधारक शेतकरी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Website Title: Latest News Dongargaon villagers start fasting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here