Home अकोले अकोले: वृक्षारोपन व वृक्ष संगोपन स्पर्धेत नाथव्ह्यॅॅलीचा तिसरा क्रमांक     ...

अकोले: वृक्षारोपन व वृक्ष संगोपन स्पर्धेत नाथव्ह्यॅॅलीचा तिसरा क्रमांक       

अकोले वार्ताहर: वृक्षारोपण व वृक्ष संगोपन  स्पर्धा 2018/2019 मध्ये नाथ व्हँली स्कूल नवलेवाडी,अकोले तिसरा क्रमांक मिळाला.आयोजक सामाजिक कार्यकर्ते व वृक्षमित्र श्री सतीश वर्पे तसेच श्री.कुमावत साहेब गट शिक्षणअधिकारी,पंचायत समिती अकोले,श्री.खताळ साहेब विस्तार अधिकारी, पंचायत समिती अकोले,श्री.गाडेकर साहेब विस्तार अधिकारी ,पंचायत समिती अकोले,सौ.भारती नवले (सरपंच ग्रामपंचायत नवलेवाडी)सौ.वैशाली पुरी(ग्रामसेविका,ग्रामपंचायत नवलेवाडी)यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व दोन वृक्ष भेट देऊन शाळेचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी श्री.कुमावत साहेब यांनी वृक्षमित्र सतीश वर्पे यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. कुमावत साहेब यांनी बोलतानी सागितले की आताच्या काळात खुपच मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण होणे गरजेचे आहे, तसेच त्या वृक्षांचे संगोपन खूप म्हतवाचे आहे,आणि सतिश वर्पे सारख्या सामान्य कुटुंबातील ज्याचे वडीलाचे छात्र वय वर्ष चार असतानी हरपलेले होते,यांची त्यांना जाणीव झाली म्हणून ते सामाजिक कार्य जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करणात हे आम्हाला माहिती होते,पण आज प्रत्यक्षात त्यांची भेट झाली.ज्या मुलांना पालकांचा आधार नाही अश्या त्यांनी 100 मुलांना शालेय साहित्य मदत स्वरूपात दिलेले आहे. कुमावत साहेबांनी सतिश वर्पे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.सरपंच भारती नवले यांनी शाळेतील शिक्षकाचे विद्यार्थाचे कौतुक केले.व सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करतांनी म्हणाले की सतीश वर्पे सारखे सामाजिक कार्यकर्ते बघायला भेटले याचा आम्हाला खुपच आनंद वाटतोय ,ते कसलाही स्वार्थ बघत नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने व प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करत आहात आणि आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या.सतिश वर्पे यांनी बोलताना सागितले की सामाजिक कार्य मी पर्यावरणाचा धोका तयार होऊ नये,ह्या स्वार्थी माणवाला समजुन सागत आहे की ये माणवा आता तरी जागा हो.झाडे कार्बनडायआँसाईड घेतात व आँक्सिजन सोडतात, जर आपल्याला आँक्सिजन भेटला नाही तर आपण जगुच शकत नाही. आपले सर्व जीवन हे झाडावरती अवलंबून आहे,अन्न वस्त्र,निवारा ह्या गरजा झाडेच पुर्ण करू शकतात,त्यासाठी कळकळीची विनंती आहे झाडे लावा आणि ती झाडे जगवा.  तसेच ज्योती राहने मँडम यांनी बोलताना आमच्या शाळेला तिसरा क्रमांकाचे बक्षीस मिळाले आम्ही सर्व शिक्षक व विद्यार्थी खुपच आंनदी आहोत.तसेच वृक्षमित्र सतीश वर्पे यांच्या कार्याचा गौरव केला.      जी.पी.राहने यांनी सतिश वर्पे त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.आणि आम्ही तुमच्या सामाजिक कार्यात सदैव बरोबर आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागरीका पाटील ७ वी सार्थकी नाईकवाडी ६ वी ह्या विद्यार्थीनी केले.व आभार श्री.नुतन हासे ४थी.ह्या विद्यार्थ्यांनीने मानले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेला भेट दिलेल्या दोन वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

Website Title:- Latest News Akole nathvhali School third in the tree rearing competition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here