Home अकोले अकोले: खिरविरे येथे नमिनाथ इण्डेन एजन्सीद्वारे मोफत गॅस वितरण.

अकोले: खिरविरे येथे नमिनाथ इण्डेन एजन्सीद्वारे मोफत गॅस वितरण.

माता भगिनिंचे आश्रु पुसणे महत्वाचे- बाळासाहेब मुळे

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन भारत सरकारचा उपक्रम उज्वला योजनेअंतर्गत कोणत्याही गरजू व गरीब महीलेला मोफत गॅस कनेक्शन देऊन एक प्रकारे माता भगिनींचे आश्रु पुसणे महत्वाचे असुन हाच या योजनेचा खरा उद्देश असल्याचे गौरोद्गार विरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळासाहेब मुळे यांनी व्यक्त केले.
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिरविरे येथे नमिनाथ इण्डेन दुर्गम क्षेत्रीय वितरण गॅस एजन्सी यांचे मार्फत गरजू व गरीब महीलांना मोफत गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब मुळे व्यासपिठावरून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे पोलीस पाटील हिरामण बेणके हे होते.
या प्रसंगि भाजपाचे तालुका सरचिटणीस नितीन जोशी, माजी तालुका अध्यक्ष धनंजय संत, सचिन जोशी, अकोले तालुका अनुलोम शिर्डी लोकसभा प्रमुख विजय वाघ, दुध संघाचे संचालक पंढरीशेठ बेणके, माजी सरपंच गणपत डगळे, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष दिनेश शहा, खादी ग्राम उद्योगाच्या संचालिका सारीखा शहा, प्रकाश शहा, राजु मेहता, महेंद्र मेहता, ठका बाबा बेणके, त्रिंबक बेणके, सावळेराम डगळे, फोटोग्राफर संतोष बेणके, सर्वोदय विदयालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत, ग्रामसेवक किसन आवारी, शिक्षक रामदास डगळे, सुधिर पराड, अरूण कदम यांसह लाभार्थी महीला तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब मुळे यांनी यांत्रीकीकरनामुळे सर्व सामान्य माणसांपर्यंत संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकार विविध योजना राबवत असुन धुर मुक्त खेडे हि योजना महत्वकांक्षी योजना असल्याचे सांगत पुर्वी स्वयंपाकासाठी इंधन म्हणून जंगल तोड मोठया प्रमाणावर केली जात होती. त्यामुळे धुर निर्माण होऊन अंधत्व येणे तसेच जंगलात सर्पदंश होऊन मृत्यु येणे यांसारख्या अपघातांना सामोरे जावे लागत होते. परंतु काळानुरूप नाममात्र दरात योजना दारापर्यंत पोहचली असल्याचे प्रतिपादन केले.
प्राचार्य अंतुराम सावंत यांनी मोफत गॅस वितरण योजना लाभदायक असुन वृक्षतोड थांबण्यास मदत झाली असुन त्यामुळे वसुंधरेचा ऱ्हास, पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन संस्कृती, पर्यावरण समतोल, सजीवसृष्टीला आवश्यक ऑक्सीजन, पर्जन्यमान, उष्णता, अवकाळी होणारा पाऊस, चक्रीवादळ, ऋतुचक्र बदल, वातावरण, हवामान बदल यांसारख्या बाबी योग्य प्रमाणात राखण्यास मोठी मदत झाली असुन मानवाची निसर्गातील ढवळाढवळ, निसर्गावरील अतिक्रमण थांबण्यास मदत झाली असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी संचालक पंढरीशेठ बेणके यांनीही आपले मत प्रतिपादीत केले.
यावेळी खिरविरे, पाडोशी, एकदरे,पेढेवाडी,केळी रुम्हणवाडी, समशेरपुर, म्हाळुंगी, सोमठाणे, तिरढे, आडवाडी, बाभुळवंडी, देवगाव,पाभुळवंडी, शेणित, कोंभाळणे आदी गावातील नोंदणीकृत महिला लाभार्थी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत दिनेश शहा यांनी गॅस कनेक्शन लाभदायक असुन शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन गाव धुरमुक्त करण्याचे अव्हान केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन लगड यांनी केले. तर प्रा. रामदास डगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Website Title: Latest News Free gas distribution by Naimnath Indian Agency in Khirvire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here