Home अहमदनगर भाजप आमदाराच्या पत्रावर होमक्वारंटाइनचा शिक्का असलेल्या तरुणीनीचा मुंबई संगमनेर प्रवास

भाजप आमदाराच्या पत्रावर होमक्वारंटाइनचा शिक्का असलेल्या तरुणीनीचा मुंबई संगमनेर प्रवास

अहमदनगर: भाजपाच्या एका आमदाराच्या पत्रावर लॉकडाऊन असताना जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करत एका तरुणीने केलेला मुंबई ते संगमनेर प्रवास वादात सापडलेला आहे. संबंधित तरुणी लॉकडाऊनचे उल्लंघन करून संगमनेरात आल्याच्या वृत्ताला तहसीलदार अमोल निकम यांनी दुजारा दिलेला आहे.  संगमनेरच्या तरुणीचाही मुंबईहून झालेला प्रवास चर्चेत आला आहे. या  तरुणीला थांबण्यास नागरिकांनीच आक्षेप घेतल्यामुळे तिला पुन्हा माघारी मुंबईला जावे लागले आहे.

कोरोनामुळे जिल्हाबंदी कोणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. मात्र,  तरीसुद्धा मुंबईच्या शिवडी येथील एका तरुणीला संगमनेरला येण्यासाठी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी पत्र दिले आणि त्या पत्राच्या आधारावर संबंधित तरुणी एका वाहनातून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून संगमनेरमध्ये पोहोचली होती. मात्र, संगमनेरमधील संतप्त नागरिकांनी हुज्जत घालत तिला पुन्हा मागे जाण्यास भाग पाडले. लॉकडाऊन असल्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी असताना या तरुणीने मुंबईच्या शिवडी येथून या तरुणीने थेट संगमनेर गाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ही तरुणी संगमनेरमध्ये कशी पोहोचली याचा शोध प्रशासन घेत आहे. आमदाराच्या पत्रामुळे आल्याने आमदार अडचणीत येण्याचे शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या तरुणीच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का असतानाही तिने मुंबई-संगमनेर प्रवास एका खासगी वाहनातून केला आहे. तरुणी संगमनेरमध्ये भाडेतत्त्वावर राहते. ही तरुणी मुंबईतून आल्याची कल्पना घरमालकाला असल्याने त्याने तिला घराची चावी देण्यास नकार दिल्यामुळे तिने हुज्जत घातल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घरमालकाने त्याची कल्पना प्रशासनाला दिल्यानंतर, तेथे आलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याने तपासणीसाठी तिला रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तिने हातातील भाजप आमदाराचे पत्र दाखवत वाद घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथे जमलेल्या काही लोकांनी तिच्या हातावरील होम क्वारंटाइनचा शिक्का बघितल्याने  तिला थांबण्यास विरोध करण्यात आला.  त्यामुळे ती आलेल्या गाडीतूनच परत माघारी गेली.

Website Title: Latest news young girl Mumbai to Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here