Home अकोले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वकिलांना दरमहा मानधन द्यावे: वकील संघ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वकिलांना दरमहा मानधन द्यावे: वकील संघ

lawyers should be paid monthly honorarium on the basis of corona

अकोले प्रतिनिधी: मार्च 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन  जाहिर केल्यामुळे न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आलेले आहे.त्यामुळे वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे मे.कोर्ट सुरळीतपणे सुरू करावे अथवा बंद ठेवायचे असेल तर सर्व वकिलांना प्रत्येकी दरमहा रुपये १५०००/-  मानधन द्यावे ,अशी मागणी अकोले तालुका वकील संघाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष ऍड.भाऊसाहेब गोडसे यांनी दिली.

राज्यात इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर,महाराष्ट्र यांच्या वतीने  सोशल डिस्टनसींग पाळून वकिलांनी आंदोलने केल्याची माहिती ऍड. गोडसे यांनी दिली.

अशा मागणीचे निवेदन  अकोले मध्ये मा. दिवाणी  व फौजदारी   न्यायाधीश,क.स्तर, अकोले व मा.तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले.  यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड.भाऊसाहेब गोडसे,ऍड.शांताराम वाळुंज,ऍड.वसंतराव मनकर,ऍड.बी.व्ही. मनकर,ऍड. आर.डी.नवले,ऍड. “एस.पी.जाधव,ऍड. एस.बी.वाकचौरे,ऍड.आर.के.जोरवर,ऍड.सौ.एम.के.हांडे ,ऍड. पी .टी.नवले, ऍड.बी. एम .नवले,ऍड.एस.डी.पोखरकर,ऍड.सय्यद बिलाल,ऍड.नवाज खतीब,ऍड.चंद्रकांत सुपे,ऍड.आदी सदस्य उपस्थित होते.

मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे.त्यामध्ये न्यायालयीन कामकाज बंद करण्यात आल्यामुळे  मे.कोर्टात कामकाज चालू नाही.त्यामुळे अनेक पक्षकार न्यायापासून वंचित राहिले आहेत. तसेच मे.कोर्टासमोर कोणतेही कामकाज वकिलांचे उपस्थितीत चालत नाही.त्याचा परिणाम वकिली व्यवसायावर गंडांतर येऊन वकिलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यांची आर्थिक परिस्थिती परिस्थिती खालावली आहे.त्यामूळे मे.कोर्टाचे कामकाज रीतसपणे सुरू करण्यात यावे अगर न्यायालयीन कामकाज बंद ठेवायचे असेल तर सर्व वकिलांना प्रत्येकी दरमहा रुपये १५०००/- मानधन द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: lawyers should be paid monthly honorarium on the basis of corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here