Sangamner: संगमनेर तालुक्यात तब्बल ७२ करोनाबाधितांची वाढ
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 72 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2157 इतकी झाली आहे.
खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील मोमीनपुरा येथे 43 वर्षीय पुरुष, नवीन नगर रोड येथे 64 वर्षीय, 31 वर्षीय पुरुष, बाजारपेठेत 60 वर्षीय पुरुष, मालदाड येथे 52 वर्षीय पुरुष 51 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 50 वर्षीय महिला, चिखली येथील 54 वर्षीय महिला व कौठे धांदरफळ येथी 48 वर्षीय पुरुष त्याबरोबरच रॅपिड अँटीजेन चाचणीतून कवठे मलकापूर येथील 61 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे 43 व 39 वर्षीय पुरुष, 42 व 19 वर्षीय महिला, सुकेवाडी येथील 36 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील 41 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथील 49 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 68 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथील 10 वर्षीय बालक व 5 वर्षीय बालिका, आश्वी खुर्द येथील 65 ते 42 वर्षीय महिला, चनेगाव येथील 27 वर्षीय महिला, देवकौठे येथे 36 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 60 व 58 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, मंगळापुर येथील 40 व 26 वर्षीय महिला यांना करोनाची लागण झाली आहे.
शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहरातील मालदाड रोड येथे 30 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 65 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, माळीवाडा येथे 20 व 19 वर्षीय तरुणी, स्वामी समर्थ नगर येथे 31 वर्षीय महिला, ७ वर्षीय बालक यांना करोनाची लागण झाली आहे.
तालुक्यातील चिंचपूर येथे 90 वर्षीय वृद्ध, 16 वर्षीय तरुणी, चिंचोली गुरव येथे 52 वर्षीय पुरुष, कनोली येथे 40 वर्षीय महिला, रहिमपुर येथे 40 वर्षीय पुरुष, मनोली येथे 27 व 25 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे 41 वर्षीय तरुण, चिखली येथे 58 व 48 वर्षीय पुरुष, 16 व 18 वर्षीय तरुण, तसेच 40 व 21 वर्षीय महिला, खराडी येथे 50 व 45 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, जांबुत खुर्द येथे 49 वर्षीय पुरुष, कुरकुटवाडी येथे 38 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 35 वर्षीय महिला कालेवाडी येथे 44 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथे 48 वर्षीय महिला, चिकणी येथे 34 वर्षीय तरुण, साकुर येथे 70 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 42 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुष, देवगाव येथे 48 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 27 वर्षीय पुरुष असे दिवाभरात ७२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंखेत वाढ होऊन 2157 वर पोहोचली आहे.
Web Title: Sangamner Taluka 72 coronavirus infected