Home अकोले अकोल्यात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या विरुद्ध आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा

अकोल्यात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या विरुद्ध आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा

अकोले : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या विरुद्ध अकोले तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

अकोले येथील बाजारतळावर आदिवासी संघटना व कार्यकर्ते एकत्र आले. तिथून घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. ज्येष्ठ नेते अशोक भांगरे म्हणाले, आपण पाच वर्षे तालुक्यात भाजप वाढून ५० हजार सभासद केले. सरकारकडून २०० कोटी रुपये तालुक्यातील रस्त्यांसाठी आणले. निळवंडे कॅनॉलप्रश्नी, प्रवरा नदीत प्रोफाईल वॉल, भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील बुडीत बंधारे आदींचा प्रश्न मार्गी लावला. यावेळी भांगरेंनी पिचडांवर कडक शब्दात टीका केली. जि.प. सदस्य डॉ. किरण लहामटे म्हणाले, पिचड यांच्यामुळे आदिवासींमध्ये घुसखोरी वाढली आहे. दि. १७ ऑगस्टला मुख्यमंत्री अकोल्यात येत आहेत. आम्हाला निदर्शने करायला भाग पाडू नका. त्यापूर्वी पिचडांवर कारवाई करावी. याप्रश्नी आपली न्यायालयीन लढाई सुरूच राहील. दि. ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे ते म्हणाले.

मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार गोसावी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संदिप दराडे, पंचायत समिती सदस्य देवराम सामेरे, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, डॉ. विजय पोपेरे, जि.प. सदस्य सुनिता भांगरे, शर्मिला येवले, अशोक माळी, दिलीप भांगरे, अमित भांगरे आदींची भाषणे झाली.

Website Titel: Letest News Tribal Mass Agitation Against Former Minister Madhukarrao Pichad In Akola

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here