Home अकोले भंडारदरा धरणाला आता लागले भरण्याचे वेध; धरणातील साठा ८२.५४ टक्क्यांवर

भंडारदरा धरणाला आता लागले भरण्याचे वेध; धरणातील साठा ८२.५४ टक्क्यांवर

भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच असून संध्याकाळपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८८६५ दलघफू झाला होता. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात दररोज अर्धा ते पाऊण टीएमसी पाणी नव्याने दाखल होत असल्याने भंडारदरा धरणाला आता पूर्ण क्षमतेने भरण्याचे वेध लागले आहेत.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायी समजली जाते. याच भंडारदरा धरणावर व धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आदिवासी बांधवांचे जनजीवन गारठले आहे, तर रतनवाडी व घाटघरमध्येही पावसाचे थैमान सुरूच असल्याने भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाला आता भरण्याचे वेध लागले आहेत. यावर्षी भंडारदरा पाणलोटात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली होती. पाच ते सहा दिवस भंडारदऱ्याच्या पाणलोटात तेव्हा पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर पावसाने १० ते १२ दिवस विश्रांती घेतली होती. परंतु, मागील दहा ते बारा दिवसांपासून भंडारदरा पावसाने सतत झोडपला जात आहे. हा पाऊस आदिवासी शेतकरी बांधवांच्या भात लागवडीसाठी उपयोगी ठरला आहे. भंडारदरा धरणातही पाणीसाठा मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागला आहे. १५ ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरण भरण्याची परंपरा यावर्षीही भंडारदरा राखणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.काल दिवसभर भंडारदरा येथे ४६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८८६५ दलघफू झाला होता, तर १२ तासात भंडारदरा धरणात २५४ दलघफू नव्याने पाणी दाखल झाले होते. तर गत चोवीस तासात भंडारदरा धरणावर १२० मि.मी. तर घाटघर येथे १७० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर पांजरेत १२२ मि.मी., रतनवाडी १५८ मि.मी., वाकी येथे ११० मि.मी. पाऊस पडला आहे. वाकी हा लघु पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरलेला असून कृ ष्णवंती नदी १०२२ क्युसेक्सने वाहत आहे.

Website Title: Letest News Warehousing Dam Has Now Begun To Fill; Dam Reserves At 82.45%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here