Home क्राईम संगमनेर: जोर्वेत घरात दारू विक्री, पोलिसांचा घरावर छापा

संगमनेर: जोर्वेत घरात दारू विक्री, पोलिसांचा घरावर छापा

Sangamner Crime:  बेकादेशीर रित्या दारूची विक्री करणार्‍या घरावर संगमनेर तालुका पोलिसांनी छापा (Raid) टाकून 18 हजार रुपयांची दारू जप्त (Seized) केली.

Liquor sale in Jorvet house, police raid the house

संगमनेर: बेकादेशीर रित्या दारूची विक्री करणार्‍या घरावर संगमनेर तालुका पोलिसांनी छापा (Raid) टाकून 18 हजार रुपयांची दारू जप्त (Seized) केली आहे. ही कारवाई दुपारी बारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील जोर्वे  येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जोर्वे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काल दुपारी जोर्वे गावात जाऊन दिलावर जमाल शेख याच्या घरावर छापा  टाकला. या ठिकाणी दिलावर हा बेकायदेशीरच्या दारूची विक्री करत होता. पोलिसांनी त्याच्या घरातून 18 हजार 170 रुपयांच्या विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त केल्या.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाट यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दिलावर जमाल भाई शेख (वय 54, राहणार जोर्वे) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 361/2023 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. बढे हे करत आहे.

Web Title: Liquor sale in Jorvet house, police raid the house

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here