Home अहमदनगर अहमदनगर: ‘बीएसएफ’मधील जवानाकडून तरुणीवर अत्याचार

अहमदनगर: ‘बीएसएफ’मधील जवानाकडून तरुणीवर अत्याचार

Ahmednagar News:  मैत्री करून व नंतर लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार (Rape) केल्याची घटना.

Young Girl Rape by BSF jawan

अहमदनगर: अगोदर मैत्री करून व नंतर लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बीएसएफ मधील जवानाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषीकेश हनुमंत जगताप (रा. टाकळसिंग, ता. आष्टी, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. फिर्यादी तरुणी मुळची पाथर्डी तालुक्यातील असून ती 2017 मध्ये शिक्षणासाठी नगरमध्ये आली होती. ती बालिकाश्रम रोड परिसरात राहत असताना तिच्या शेजारी रूमवर ऋषीकेश राहत होता. 15 ऑगस्ट 2018 मध्ये त्यांच्यात मैत्री झाली. मला तुझ्यावर प्रेम झाले, मला तु खुप आवडतेस व मला तुझ्यासोबत लग्न करायचे, असे म्हणून ऋषीकेश याने तरुणीसोबत संबंध ठेवले.

दरम्यान,  पीडित तरुणी नोकरीनिमित्त रांजणगाव (जि. पुणे) येथे गेली. तेथेही ऋषीकेश याने तरुणीवर अत्याचार केला. मार्च 2021 मध्ये ऋषीकेश याला बीएसएफ मध्ये नोकरी लागली. तो ट्रेनिंगसाठी निघून गेला तर फिर्यादी तरुणी पाथर्डी येथे गावी गेली. 14 एप्रिल 2023 रोजी ऋषीकेश ट्रेनिंगवरून आला व त्याने पीडित तरुणीला नगरला बोलून घेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पीडित तरुणीने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. पीडितेला मारहाण करून माळीवाडा बसस्थानकावर सोडून दिले. याबाबत पिडीत तरुणीने फिर्याद दाखल केली असून बीएसएफ मधील जवानाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Young Girl Rape by BSF jawan

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here