Home क्राईम संगमनेर शहरात रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडले धक्कादायक

संगमनेर शहरात रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडले धक्कादायक

Sangamner theft Crime:  रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून  दोघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन धुमस्टाईलने पोबारा केल्याची घटना.

woman who went for a walk in the city of Sangamner pulled her mangalsutra theft 

संगमनेर: संगमनेर बस स्थानकात चोर्‍यांचे (Theft) प्रमाण थांबावे या दृष्टीने शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर येताच पोलिसांनी तेथील सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर चोरांनी आता आपले चोरी करण्याचे ठिकाण बदले असून आता तर रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून दोघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन धुमस्टाईलने पळून गेले आहे. शहरातील पावबाकी रोड येथे हि घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सविता व शशिकांत मुळे हे पती पत्नी जानकीनगर येथे राहतात. ते रविवार (ता.11) जून रोजी रात्री जेवन झाल्यानंतर फिरण्यासाठी गेले होते त्याच दरम्यान पाठीमागून दुचाकीवरुन येणार्‍या दोघा अज्ञात चोरट्यांनी सविता यांच्या जवळ दुचाकी घेऊन गळ्यातील मनी मंगळसूत्र असलेली सोन्याची) ओढून धुमस्टाईलने चोरून नेले. चाळीस हजार रूपये किंमतीची चेन होती.

याबाबत सविता मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 472/2023 भारतीय दंड संहिता कलम 392 नुसार दाखल (Filed a Case) केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पवार हे करत आहे.

Web Title: woman who went for a walk in the city of Sangamner pulled her mangalsutra theft 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here