Home Accident News शनिशिंगणापूर येथून परत निघालेल्या शनिभक्तांवर काळाचा घाला, चार जण जागीच ठार

शनिशिंगणापूर येथून परत निघालेल्या शनिभक्तांवर काळाचा घाला, चार जण जागीच ठार

Ahmednagar News:   कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघातात (Accident) तीन शनिभक्तांसह टेम्पोचालक ठार झाल्याची घटना.

Tempo driver along with three Saturn devotees were killed in a head-on Accident

नेवासा: शनिशिंगणापूर येथून देवदर्शन करून परत निघालेल्या मध्य प्रदेशातील इंदूर येथील शनिभक्तांवर वडाळा (बहिरोबा) जवळ काळाने घाला घातला. कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन तीन शनिभक्तांसह टेम्पोचालक ठार झाला असून एक महिला जखमी झाली. हा अपघात एकढा भीषण होता या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

राहुल परमेश्वर शर्मा, योगेश परमेश्वर शर्मा (दोघेही रा. कलंदी रोड, इंदूर, मध्य प्रदेश), हर्षित मनोहर शर्मा (रा. हिंमतनगर, मध्य प्रदेश) आणि अविनाश मंडलेचा (रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर, रेणू परमेश्वर शर्मा (रा. कलंदी रोड, इंदूर) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रविवारी दुपारी 11 वाजता कार (एमएच 14 सीएस 9007) ही नगरकडून संभाजीनगरच्या दिशेने जात होती. मात्र, अचानक काही समजण्याच्या आत रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकून समोरून चाललेल्या टेम्पोला (एमएच 48 टी 5319) जाऊन धडकली. हा टेम्पो संभाजीनगरहून नगरकडे जात होता. दुभाजक ओलांडून टेम्पोला धडकल्याने कार जागेवर पलटली.

अपघातस्थळी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यांचे सहायक पोलिस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी भेट देऊन जखमींसह मृतांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Tempo driver along with three Saturn devotees were killed in a head-on Accident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here