Home क्राईम तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार; दोन कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार; दोन कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

आर्थर रोड तुरुंगात एका कैद्यावर लैंगिक अत्याचार (unnatural abused) झाला असल्याची घटना.

Unnatural abused of prisoner in jail A case has been registered against two prisoners

मुंबई : मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात एका कैद्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याची घटना समोर आली आहे.  अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या दोन कैद्यांनी हा प्रकार केला आहे.

समीर शब्बीर शेख ऊर्फ पुडी व राशीद हसन फराज अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, 7 जूनला हा प्रकार घडला आहे. तसेच 9 जूनला आरोपीने तक्रारदाराला मारहाण केल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे. दोन्ही आरोपींना अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर दोन्ही आरोपींना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते.

आरोपींनी स्नानगृहात एका 23 वर्षीय कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी बराकमध्ये या कैद्याला शिवीगाळ केली, तसेच त्यातील आरोपीने पीडित कैद्याला मारहाणही केली. याप्रकरणी कैद्याने ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली.

सोमवारी पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक अत्याचार, धमकावणे, मारहाण, केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून  या प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे न्यायालयीन कारवाई करून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Unnatural abused of prisoner in jail A case has been registered against two prisoners

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here