Home क्राईम संगमनेरात पोलिस असल्याचे सांगून अकोलेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यास लुटले

संगमनेरात पोलिस असल्याचे सांगून अकोलेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यास लुटले

Sangamner Crime:  पोलीस असल्याची बतावणी करून पल्सर मोटार सायकल वरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील चार सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची अंगठी असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास (robbed) केल्याची घटना.

retired employee of Akole was robbed by claiming to be the police

संगमनेर: पोलीस असल्याची बतावणी करून पल्सर मोटार सायकल वरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील चार सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची अंगठी असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लांबून पलायन केले. ही घटना काल दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात घडली.

धामणगाव रोड धुमाळवाडी ता.अकोले येथील सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण पंढरीनाथ धुमाळ हे आपल्या वाहनांमधून संगमनेर येथील अकोले नाका परिसरातून जात होते. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे पल्सर मोटारसायकल वरुन समोरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी धुमाळ यांच्या गाडीसमोर त्यांची गाडी उभी करुन पोलिस असल्याची बतावणी करुन धुमाळ यांच्या गळ्यातील चैन, हातातील चार सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची अंगठी काढण्यास सांगितले.

हे दागिने एका कागदाचे पुडीत बांधून त्या डिकीमध्ये ठेवतांना हात चलाखी करुन दागिने ठेवलेल्या पुडीच्या ऐवजी वाळुची पुडी ठेवुन दोघे चोरटे पसार झाले. या चोरट्यांनी 2 लाख 10 हजार रुपये किमतीची 70 ग्रॅम ची गळ्यातील सोन्याची चैन, 22 हजार 500 रुपयांची साडेसात ग्रॅमची सोन्याची अंगठी, 15 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्याा अंगठ्या, असा एकूण 2 लाख 64 हजार रुपयांचे दागिने चोरून पलायन केले.

आपली फसवणूक झाली असल्याचे धुमाळ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले. याबाबत लक्ष्मण पंढरीनाथ धुमाळ (वय 69 वर्षे) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु.र.नं .474/2023 भा.दं. वि. कलम 420, 170, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहेे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहे.

Web Title: retired employee of Akole was robbed by claiming to be the police

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here