Home क्राईम संगमनेर तालुक्यात देशी दारूचे दुकान फोडले, ४३ बॉक्स चोरीस

संगमनेर तालुक्यात देशी दारूचे दुकान फोडले, ४३ बॉक्स चोरीस

liquor shop burglarized Sangamner news 

संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील देशी दारूच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी ४३ बॉक्स देशी दारूचे चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशियीतांस ताब्यात घेतले आहे.

वडगाव पान येथील शौकत जाहगिरदार यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात सुरेश गेनराज काशीद हे खासगी नोकरीस आहे. काशीद नेहमीप्रमाणे देशी दारूच्या दुकानाला कुलूप लावून दुकान बंद करून गेला होता. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने देशी दारूचे दुकानाच्या शेडच्या पाठीमागील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. १ लाख ८ हजार ७६० रुपये किमतीच्या देशी दारू बॉबी संत्रा कंपनीच्या बाटल्या असे ४३ बॉक्स चोरून नेले. याप्रकरणी सुरेश काशीद यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास अण्णासाहेब दातीर हे करीत आहे.  

Web Title: liquor shop burglarized Sangamner news 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here