Home Accident News Accident: संगमनेर तालुक्यात त्या पुलावर इंडिगो कार व पिकअपमध्ये अपघात  

Accident: संगमनेर तालुक्यात त्या पुलावर इंडिगो कार व पिकअपमध्ये अपघात  

Sangamner Accident indigo car an pik up

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे बाजारतळ नजीक ओढ्यातील अरुंद पुलावर अपघाताचा सिलसिला सुरूच आहे. गुरुवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास पुन्हा इंडिगो कार व पिकअप यांच्यात अपघात झाला.

सुदैवाने या अपघातात दोन्ही चालक बचावले. तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे डांबरी रस्त्यावर लोणीकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो कार व लोणीच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपची तळेगाव बाजारतळानजीक पुलावर धडक होत अपघात झाला. सदर अपघातातून कार चालक सतिश गोसावी व पिकअप चालक दोघेही सुदैवाने बचावले. इंडिगो कारचे मोठे नुकसान झाले आहे. पिक अप चालक वाहन घेऊन निघून गेला. या रस्त्याचे  व पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणी युवक कार्यकर्त्यांनी केली होती. रुंदीकरण न झाल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.  

Web Title: Sangamner Accident indigo car an pik up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here