Home नागपूर सात महाविद्यालयीन तरुण पोहायला गेले अन घडले अघटीत

सात महाविद्यालयीन तरुण पोहायला गेले अन घडले अघटीत

भावाला वाचवताना लहान भावाचा बुडून ( drowned ) मृत्यू.

Little brother drowned while saving brother

महाड |रायगड) : शिवाजी वाळण कोंड येथील धबधब्यावर पोहायला गेलेल्या सात महाविद्यालयीन तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. स्मित घाडगे (वय २०, रा. दहिवड) असे त्याचे नाव आहे.

तो आपला मोठा भाऊ यश घाडगे बुडत असताना त्याला वाचविण्यास गेला आणि त्याचाच बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने यश बुडत असल्याचे पाहून स्मित याने पाण्यात उडी मारली. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

नागपूर घटना: पोहता न आल्याने दोघांना जलसमाधी

उमरेड: तालुक्यातील मकरधोकडा तलावात १३ जुलैला बुटीबोरी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेला महिनासुद्धा झाला नाही. अशातच सोमवारी दुपारी पुन्हा दोन तरुणांना पोहण्याचा मोह आवरता न आल्याने आपला जीव गमवावा लागला. आयुष ईश्वर सातपुडके (२२), निखील मुकुंदा भगत (२५) अशी तलावात बुडालेल्यांची नावे आहेत. यापैकी आयुष सातपुडके या तरुणाचा मृतदेह सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मिळाला. निखील भगत या तरुणाचा सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत शोध सुरू होता.

Web Title: Little brother drowned while saving brother

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here