Home अहमदनगर अहमदनगर: गाडीत बॉम्ब असल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली अन….

अहमदनगर: गाडीत बॉम्ब असल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली अन….

Ahmednagar News:  बॉम्बस्फोटाची खोटी माहिती देणाऱ्यावर केला गुन्हा दाखल कुकाणा येथील प्रकार.

youth informed the police that there was a bomb in the car

 कुकाणा | नेवासा: पोलिस चौकीच्या शेजारी उभ्या असलेल्या गाडीत बॉम्ब आहे. त्याचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो. लवकर या, अशी खोटी माहिती देऊन पोलिसांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्माईल बाबूलाल सय्यद (रा. भेंडा, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत पोलिस नाईक बाबासाहेब दहिफळे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने कुकाणा पोलिस चौकीच्या बाजूला एक गाडी आहे. त्यात बॉम्ब असून, त्याचा स्फोट होऊ शकतो, अशी माहिती डायल ११२वर नियंत्रण कक्षात दिली. या तक्रारीची दखल घेऊन महिला अंमलदार दीपाली मते यांनी सदर नेवासा पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब दहिफळे यांना दिली. त्यांनी तात्काळ कुकाणा येथील पोलिस चौकी येथे जाऊन खात्री केली. मात्र तिथे त्यांना काही एक आढळून आले नाही. त्यामुळे सदरची माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी भादंवि कलम १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: youth informed the police that there was a bomb in the car

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here