Home Live Marathi Breaking News ब्रेकिंग न्यूज | Breaking Murder | Rape | Crime | Accident |...

ब्रेकिंग न्यूज | Breaking Murder | Rape | Crime | Accident | Theft News

Live Marathi news Today

Ahmednagar Latest Marathi News | ब्रेकिंग न्यूज | Breaking Murder | Rape | Crime | Accident | Theft News: –


धक्कादायक! औरंगाबादेत तरुणाची दगडाने ठेचून हत्या, मारेकऱ्यांनी गुप्तांगही जाळले

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Aurangabad) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागामध्ये असलेल्या मैदानात (Ground) ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी (accused) तरुणाची हत्या (killing) केल्यावर त्याचे गुप्तांग जाळल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एक पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाची हत्या होऊन २४ तासांपेक्षा अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी यावेळी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरुन हा वाद झाल्यावर ही हत्या केली असावी असा देखील अंदाज पोलिसांनी यावेळी वर्तवला आहे. मृतक तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Virginity Test: सुनेवर कौमार्यभंगाचा ठपका ठेवून छळ, उच्चशिक्षित पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबीयांनी सुनेवर कौमार्यभंगाचा (Virginity Testing) ठपका ठेऊन तिचा छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. घटस्फोट देण्यासाठी तिचे लग्नाआधी अनैतिक संबंध असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय (FIR against in-laws and husband for virginity test in Pune).

28 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली असून तिच्या अमेरिकास्थित पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला उच्चशिक्षित (Highly Educated) आहे. काही दिवसांपूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले होते.

दरम्यान, मधुचंद्राच्या पहिल्या रात्री तक्रारदार महिलेला ब्लिडिंग का झाले नाही, अशी विचारणा केली गेली. लग्नाच्या आधी कोणासोबत शारीरिक संबंध होते का? अशी विचारणा करून वारंवार भांडण काढली. तक्रारदार महिलेला मारहाण करून घटस्फोट (Divorce) देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला.

या सगळ्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून, भांडणामुळे काही दिवसांपूर्वी ते पुन्हा भारतात आले. सध्या ते पुण्यात (Pune) राहतात आणि इथे देखील तिचा छळ सुरु होता.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर तक्रारदार महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी 498 अ, 323, 504, 506, 34 इत्यादी कलमानुसार पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Gurumauli Computers Website marketing

Web Title: Breaking Murder Rape Crime Accident Theft News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here