Home अहमदनगर सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून ३५ लाखांचे सोने लंपास

सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून ३५ लाखांचे सोने लंपास

Loni 35 lakh was smashed in the car of a goldsmith

राहता | लोणी | Loni: राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून सुमारे ३६ लाखांचे सोन्या चांदी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली.

लोणी खुर्द गावात पिंपरी निर्मळ रस्त्यालगत संतोष कुलथे यांचे कुलथे ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. कुलथे यांनी नेहमीप्रमाणे सात वाजेच्या दरम्यान दुकान बंद केले. दुकानातील सोन्या चांदीचे दागिने भरलेल्या तीन बॅगा कारमध्ये पुढच्या सीटवर ठेवल्या. कार लॉक करून ते दुकान बंद करण्यासाठी गेले असता तीन मोटारसायकलवरून सहा दरोडे खोर कारजवळ आले. एकाने कराची काच फोडून बॅगा काढल्या. काच तुटल्याचा आवाज आल्यावर कुलथे व त्यांच्या दुकानातील कामगार सुनील डहाळे यांनी आरडाओरडा केला. मात्र दरोडेखोरानी चाकूचा धाक दाखवत फरार झाले. कुलथे यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Loni 35 lakh was smashed in the car of a goldsmith

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here