Home राहुरी हॉटेल चालविण्याच्या कारणावरून तलवारीने वार, गुन्हा दाखल

हॉटेल चालविण्याच्या कारणावरून तलवारीने वार, गुन्हा दाखल

Rahuri Sword attack for running a hotel

राहुरी | Rahuri: नगर मनमाड रोडवरील हॉटेल समोर काल रात्री साडे नऊ  वाजेच्या सुमारास हॉटेल चालविण्यास घेण्यावरून प्रविण नावाच्या तरुणास धारदार तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी प्रवीण विलास कोळसे रा. मानोरी ता. राहुरी याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून राहुल गंगाधर कल्हापुरे रा. देस्वंडी दादा कुलट, किरण कुलट, अमोल कुलट सर्व रा. वळण ता. राहुरी यांच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याचा प्रयत्न केल्याबद्धल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीनुसार हॉटेल व्यवसाय करत असताना आरोपीने आम्ही चालवायला घेतलेले हॉटेल तुम्ही का घेतले असे म्हणत तलवारीने वार केले. मित्र निजाम दगडू पठाण यांच्या डोक्यात त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच प्रमोद दसपुते, ऋषिकेश घोडके यांना देखील मारहाण करत जखमी केले. डीवायएसपी राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Rahuri Sword attack for running a hotel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here