Home राहाता तलवार, चाकूने लुटारूंचा ट्रक चालकावर हल्ला, चालकाचा मृत्यू

तलवार, चाकूने लुटारूंचा ट्रक चालकावर हल्ला, चालकाचा मृत्यू

Loni Nirmal Pimpari robbers attacked the truck driver

लोणी: गव्हाचा ट्रक घेऊन नेणाऱ्या ट्रकवर अज्ञात लुटारूनी हल्ला केला यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.

निर्मळपिंपरी ता. राहता येथील शिवारात टोलनाक्यावर मध्यप्रदेश कडून बेंगलोर येथे घेऊन जाणाऱ्या मालट्रक चालकाला दरोडेखोरानी बेदम मारहाण केली यात चालकाचा मृत्यू झाला. तर त्याच्या सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

या दरोडे खोरांच्या मारहाणीत चालक कुलदीपसिंग तुंब रा. जिल्हा धार मध्यप्रदेश याचा मृत्यू झाला आहे. तर सहकारी भूपेंद्र सिंग बहादूर ठाकूर जि. धार मध्यप्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे.

सहा सात दरोडेखोरांनी तलवार व चाकू, लाकडी दांडके गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकवर हल्ला केला त्यानंतर लुटारू शेतात पळून गेले. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अज्ञात सहा सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Loni Nirmal Pimpari robbers attacked the truck driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here