Home अहमदनगर Bribary: लाचखोर पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात

Bribary: लाचखोर पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात

Loni Police caught in bribery trap

राहता | Bribary Case: कोळपेवाडी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादीकडून २० हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लोणी पोलीस ठाण्यात नेमणूक असणाऱ्या मात्र संलग्न असलेल्या शिर्डी येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेला भाऊसाहेब संपत सानप याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोळपेवाडी येथे फिर्यादीचा वाळू वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. पोलीस नाईक भाऊसाहेब सानप याने २७ मे रोजी ८ वाजेच्या सुमारास ३० हजाराची रक्कम मागितली होती. तडजोडी नंतर २० हजार देण्याचे कबूल केले. फिर्यादीने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यासमक्ष व पंचासमक्ष २० हजार रुपये मागताना पुरावा तयार केला. त्याप्रकरणी त्याच्या विरोधात सोमवारी लाचलुचपत विभागाने कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सी.बी. पालकर हे करीत आहे.

Web Title: Loni Police caught in bribery trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here